कल्याणमध्ये पुन्हा डॉक्टरला मारहाण, भानुज्योत रुग्णालयातील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कल्याणमध्ये पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वारंवार तोच प्रश्न विचारल्याने डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाला बाहेर जाण्यास सांगितले. या रागातून रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. याप्रकरणी संघटनेच्या डॉक्टरांच्या मदतीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बरगडी तुटल्याने जयवंत देशमुख हे कल्याण पूर्वेतील भानुज्योत या खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. देशमुख यांच्यावर उपचार करणारे डॉ. औषध योगेंद्र जयस्वाल हे त्यांना औषध समजावून सांगत होते. यादरम्यान देशमुख यांचा मुलगा विनीत याने डॉक्टरांना दहा ते पंधरा वेळा एकच प्रश्न विचारला. यामुळे डॉक्टरांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले.

विनीत डॉक्टरांचा एकेरी उल्लेख करत बाहेर गेला. मात्र काही वेळातच पुन्हा केबिनमध्ये येत त्याने डॉक्टरला मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.