Colombo Test: ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरताच धोनी-गिलख्रिस्टला टाकले मागे; ‘या’ यादीत आला पहिल्या स्थानी

कोलंबो येथे श्रीलंका विरुद्ध भारत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी, 24 ऑगस्ट) ऋषभ पंत फलंदाजीला आला असता त्याने दिग्गज विकेटकीपर्स एमएस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्ट यांना मागे टाकले आहे.
पंतला या सामन्याच्या पहिल्या दिवशी (23 ऑगस्ट) दुखापत झाली होती. यामुळे तो 3 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला होता. तो दुसऱ्या दिवशी फलंदाजीला परतला असता त्याने चौकार-षटकार मारत धोनी आणि ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टला मागे टाकले आहे.
या सामन्यातील आपला पहिला षटकार मारताच पंतने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गिलख्रिस्टला मागे टाकत तिसरे स्थान काबीज केले. या यादीत त्याच्यापुढे बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम आहेत.
पंतने पहिल्या डावातील 90 व्या षटकात हा षटकार मारला. श्रीलंकन गोलंदाज सातत्याने बाउन्सर टाकून भारतीय फलंदाजांवर हल्ले करत आहे. पंतलाही लाहिरु कुमाराने शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पंतने लेग साईडच्या दिशेने उत्तम शॉट खेळला आणि चेंडूला मैदानाबाहेर पाठवले.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे पुरुष फलंदाज
138 – बेन स्टोक्स
107 – ब्रेंडन मॅक्युलम
101* – ऋषभ पंत
100 – ॲडम गिलख्रिस्ट
98 – ख्रिस गेल
या डावात पंतगिरी सुरूच राहिली. त्याने अनेक उत्तम शॉट्स खेळले आणि धोनीचाही एक मोठा विक्रम मागे टाकला. पंत आता परदेशी भूमीवर किंवा न्यूट्रल व्हेन्यूवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने धोनीला मागे टाकले आहे.
धोनीने परदेशी भूमीवर किंवा न्यूट्रल व्हेन्यूवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये 2496 धावा केल्या होत्या. आता पंतने त्याला मागे टाकत पहिले स्थान काबीज केले आहे.
भारतीय विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावा
(परदेशात/तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या कसोटीत)
1) 2501* – ऋषभ पंत (सरासरी: 41.68)
2) 2496 – एम. एस. धोनी (सरासरी: 32.84)
3) 1209 – फारुख इंजिनिअर (सरासरी: 32.67)
4) 1109 – सय्यद किरमाणी (सरासरी: 21.74)
5) 901 – किरण मोरे (सरासरी: 29.06)
(SL vs IND 2री कसोटी: ऋषभ पंतने एमएस धोनी आणि ॲडम गिलख्रिस्टचे रेकॉर्ड तोडले; भारतीय यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा आणि कसोटीत सर्वाधिक षटकार)
Comments are closed.