अफगाणिस्तानची भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा! या खेळाडूकडे संघाची धुरा

आगामी काळात पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघ दिल्लीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे यजमानपद भूषवणार आहे. अफगाणिस्तान भारतात टीम इंडियाचे यजमानपद करणार आहे.
अफगाणिस्तान आणि भारत (AFG vs IND) यांच्यात 13 सप्टेंबरपासून 3 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या घरेलु मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेत इब्राहिम झाद्रान अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे, तर स्टार वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकचे संघात पुनरागमन झाले आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही टी-20 मालिका नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jetli Stadium Navi Delhi) खेळवली जाईल. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबरला, दुसरा सामना 15 सप्टेंबरला आणि तिसरा म्हणजेच अंतिम सामना 17 सप्टेंबरला खेळवला जाईल. अफगाणिस्तानचा पूर्णवेळ टी-20 कर्णधार म्हणून इब्राहिम झाद्रानची (Ibrahim Zadran) ही पहिलीच मालिका असेल. राशिद खानच्या (Rashid Khan) जागी झाद्रानकडे अफगाणिस्तानच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नेहमीच सर्व महत्त्वाच्या स्पर्धांसाठी एक संतुलित आणि पूर्णपणे तयार संघ निवडण्याचा प्रयत्न केला आहे. भारत विरुद्धच्या मालिकेसाठीही आम्ही हाच दृष्टिकोन ठेवला आहे. अफगाणिस्तानचा संघ या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी मला आशा आहे. अफगाणिस्तान प्रथमच एखाद्या मोठ्या क्रिकेट खेळणाऱ्या देशाचे यजमानपद भूषवत आहे, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही अफगाण क्रिकेटच्या प्रगतीची आणि आम्ही ठरवलेल्या रणनीतिक लक्ष्यांच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याची पावती आहे.
भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ: इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोती, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई आणि नवीन-उल-हक.
Comments are closed.