Mumbai News – चर्चगेट मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवासी आत अडकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चर्चगेट येथील भुयारी मेट्रो स्थानकात मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अचानक लिफ्ट बंद पडली. लिफ्ट बंद पडल्याने आत सहा प्रवासी अडकले होते. प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र काही वेळात प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे भुयारी मेट्रो मार्गीकेचा प्लॅटफॉर्म आणि पहिल्या मजल्यादरम्यान लिफ्ट बंद पडली होती.

दरम्यान, चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट बंद पडल्याची घटना ताजी असतानाच याच स्थानकातील सरकत्या जिन्यामध्येही बिघाड झाला आहे. यामुळे प्रवाशांना पायऱ्यांवरून चढ उतार करावं लागत आहे.

Comments are closed.