डेंग्यू-मलेरियापासून कुटुंबाला ठेवा सुरक्षित; घरात करा हे बदल

पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांचा धोका वेगाने वाढतो. सतत पडणारा पाऊस आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात डेंग्यू आणि मलेरियांसारख्या आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे स्वत:सह कुटूंबाची काळजी घेऊन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे पाहूयात.

साचलेले पाणी उपसा

कुंडीच्या खालचा ट्रे, कुलर, पाण्याच्या उघड्या टाक्या, जुने टायर्स, छतावर पडलेले डबे किंवा बादल्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. डेंग्यू पसरवणारा डास स्वच्छ साचलेल्या पाण्यातच अंडी घालतो.

खिडक्या -दरवाजांना जाळ्या

संध्याकाळच्या वेळी डास घरात शिरण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे खिडक्यांना बारीक जाळ्या लावा आणि संध्याकाळी 5 ते 7  दरम्यान दरवाजे बंद ठेवा.

पूर्ण बाह्यांचे कपडे

घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.

मॉस्किटो रिपेलंट्सचा वापर

झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. याशिवाय मॉस्किटो रिपेलंट्सचा योग्य प्रकारे वापर करावा.

धूर व स्वच्छता

आठवड्यातून एकदा घरात कडुलिंबाचा धूर किंवा कापूर जाळावा. यामुळे डास पळून जातात. तसेच घरातील दमट आणि अंधारे कोपरे नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवावेत.

तज्ज्ञांचा सल्ला –

तीव्र ताप,  डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी किंवा उलट्या होणे अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – गरोदरपणात डोहाळे लागण्यामागे असतात ही कारणं

Comments are closed.