चर्मकार संघाच्या दक्षिण व दक्षिण मध्य मुंबई विभाग अध्यक्षपदी सुरेश काळे
राष्ट्रीय चर्मकार संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने राष्ट्रीय कार्यकारिणीचा महापरिसंवाद, आढावा बैठक तसेच पद नियुक्ती प्रदान सोहळा पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी समाजसेवक सुरेश काळे यांची राष्ट्रीय चर्मकार संघाच्या दक्षिण व दक्षिण मध्य मुंबई या विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत चर्मकार संघाच्या आगामी वाटचालीसंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या समाजबांधवांना पद नियुक्ती पत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
Comments are closed.