केळवली रेल्वे फाटक 'डेंजर झोन'
खोपोली-कर्जत मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात रोज असंख्य प्रवाशांची वर्दळ असते. मात्र हे फाटक सध्या ‘डेंजर झोन’ झाले आहे. पावसाळ्यात तर फाटक ओलांडताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून रेल्वेचे रूळ जमिनीपासून वर आले आहेत. रुळांच्या मधील डांबराचा भाग खाली गेल्याने दुचाकी, कार व अन्य वाहने घसरण्याचे भीती निर्माण झाली आहे. रेल्वे फाटकातील या डेंजर स्थितीची त्वरित गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
Comments are closed.