कुकू कोहलींच्या निधनाने अजय देवगण भावुक, म्हणाला, ‘तुम्ही माझं आयुष्य बदललंय’ – Tezzbuzz
फुल और कांटे या सारख्या उत्तम चित्रपचटांचे दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन झाले आहे. 77 व्या वर्षी त्यांनी आखेरचा श्वास घेतला आणि बॉलिवूड इंडस्ट्री त्याच्या जाण्याने धक्काच बसला. मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तसेच त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला मात्र अजय देवगणला त्याच्या जाण्याने फार मोठा धक्का बसला, कारण या अभित्याला या चित्रपटसृष्टीत त्यांनीच लाँच केले होते. या दरम्यान अजय देवगण याने एक अंत्यत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अजय (ajay)देवगण हे कुकू कोहली यांच्या अचानक झालेल्या निधनाने खचुन गेले आहेत. ज्या दिग्दर्शकाने या क्षेत्रात आणले आणि मोठा कलाकार होण्यासाठी पाठिंबा दिला त्यांच्या बाबतच्या दुख:द वार्ता मुळे ते भावुक झाले आहेत. अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानी या पोस्ट मध्ये म्हणले आहे की, काही माणसे तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. कुकूजी त्या खास व्यक्तींपैकी एक होते. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यासाठी मी तुमचा सदैव ऋणी राहीन. तुमची आठवण कायमच येत राहील, कुकूजी. ओम शांती. अजय या पोस्टने असे समजते की अभिनेत्या आयुष्यात त्याचे किती महत्व होते.
कुकूजी आणि अजय देवगण यांच्या व्यावसायिक नात्याची सुरुवात 1999 च्या ब्लाॅकबस्टर ‘फूल और कांटे’ चित्रपट पासुन झाली आहे. याच चित्रपटाद्वारे कुकू कोहलीने अजय देवगणला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली. आणि त्यानंतर या चित्रपट खुप गाजला. आणि अभिनेत्याचे जीवनच सारे बदलुन गेले. मात्र कुकू कोहली आता आपल्यात नसले तरी ते त्याची चित्रपटाबाबतची शिकवण आणि त्याचे काम नेहमीच लक्षात राहिल.
हेही वाचा
बेपत्ता मुलीच्या शोधासाठी आईची धडपड, गांधारी चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
Comments are closed.