इंडिगो विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी

बेंगळूरमध्ये सुरक्षित लँडिंग; तपासात अफवा असल्याचे उघड

वृत्तसंस्था/ बेंगळूर

लखनौमधून बेंगळूरमध्ये येणाऱ्या इंडिगो विमानामध्ये बुधवारी अचानक घबराट पसरली. फ्लाइट 6-ई-231 ला बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानातील कर्मचाऱ्याला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा संदेश मिळाल्यानंतर क्रूने सुरक्षा नियमांनुसार आवश्यक ती पावले उचलली. त्यानंतर सकाळी सुमारे 9:40 वाजता विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. क्रूने सुरक्षा नियमांनुसार सर्व प्रवाशांना बाहेर काढले. प्रवाशांना विमानातून उतरवल्यानंतर, सीआयएसएफ आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी केली. विमानाच्या तपासानंतर बॉम्बची धमकी खोटी असल्याचे आढळून आले. तपासणीअंती विमानफेरीच्या पुढील उ•ाणांना परवानगी देण्यात आली.

Comments are closed.