Nepal Flood Update – तिबेटमध्ये पुन्हा बांध फुटल्याची माहिती; नेपाळमध्ये अलर्ट जारी, बचावकार्य तात्पुरते स्थगित
नेपाळ-तिबेट सीमेवर असणारे पाण्याचे नैसर्गिक बांध पुन्हा फुटल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण पुराचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महापुराचा इशारा देण्यात आल्याने नेपाळ सरकारची चिंता वाढली आहे.
तिबेटमध्ये तलाव फुटल्याची अधिकृत सूचना मिळाली असून प्रत्यक्ष नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे. सध्या पाणी किती उंचीवरून वाहत आहे, याचा अचूक अंदाज बांधणे कठीण झाले आहे, असे रसुवा जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिली. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पाळमधील छोछेन खोला आणि पुरेपू सांगपो नद्यांच्या संगमाजवळ सुमारे 20 लाख घनमीटर पाण्याचा साठा असलेला एक मोठा तलाव तयार झाला होता. गुरुवारी सकाळपासूनच हा तलाव ओव्हरफ्लो लागला होता, असे चीनच्या जलसंसाधन मंत्रालयाने स्पष्ट केले. तसेच तलावातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने आणि पुराचा धोका निर्माण झाल्याने केरुंग सीमावर्ती भागात चीनने आपले बचावकार्य तात्पुरते थांबवले आहे. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात सुरू असलेले हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य पुढील 90 मिनिटांसाठी थांबवण्यात आले आहे.
सिचुआन प्रांतात भूकंपाचा धक्का
एका बाजूला महापुराचे संकट असतानाच, तिबेटला लागून असलेल्या चीनच्या सिचुआन प्रांतात शुक्रवारी 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे या भागात भूस्खलन आणि आपत्तीचा धोका अधिक वाढला आहे. सध्या नेपाळ आणि चीन दोन्ही देशांचे प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
📈 फुजी, चीनच्या 19 किमी NW जवळ 5.0 तीव्रतेच्या भूकंपाची पुष्टी झाली.
तीव्रता: 5.0
स्थान: 19 किमी (12 मैल) फुजी, चीनचे NW
तारीख: 2026-08-28 आणि वेळ: दुपारी 01:13 (स्थानिक वेळ)#भूकंप #भूकंपाचा #ब्रेकिंग #अलर्ट #चीन pic.twitter.com/s4N48Y5CbC— भूकंपाच्या सूचना (@Earthquake2day) 28 ऑगस्ट 2026
Comments are closed.