64 घरांचा राजा! कारुआनाला धूळ चारत प्रज्ञानंदने इतिहास घडवला, ‘ग्रँड चेस टूर’ जिंकणारा ठरला पहिला हिंदुस्थानी बुद्धिबळपटू
हिंदुस्थानचा तरुण ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने गुरुवारी बुद्धिबळ जगतात नवा इतिहास रचला आहे. ग्रँड चेस टूरचे विजेतेपद पटकावणारा तो पहिला हिंदुस्थानी बुद्धिबळपटू ठरला आहे. अंतिम सामन्यात गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध 6 गुणांच्या पिछाडीवरून सनसनाटी पुनरागमन करत 20 वर्षीय ग्रँडमास्टरने हे ऐतिहासिक विजेतेपद आपल्या नावावर केले.
क्लासिकल फेऱ्यांअखेर प्रज्ञानंद 3-9 असा तब्बल 6 गुणांनी पिछाडीवर होता. अंतिम दिवशी विजेतेपदासाठी त्याला चमत्कारिक कामगिरीची गरज होती. प्रज्ञानंदने रॅपिड श्रेणीतील दोन्ही सामने जिंकून 11-9 अशी सरशी घेतली. कारुआनाने दुसरा ब्लिट्झ सामना जिंकत 12-12 अशी बरोबरी साधली. मात्र, प्रज्ञानंदने तिसऱ्या ब्लिट्झ फेरीत बाजी मारत पुन्हा आघाडी घेतली.
अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी फक्त ड्रॉची गरज असताना, प्रज्ञानंदने अतिशय संयमी खेळ करत ‘थ्रीफोल्ड रिपिटिशन’द्वारे सामना टाय केला आणि विजेतेपदावर मोहर उमटवली. एकूण 6 सामन्यांपैकी प्रज्ञानंदने 3 सामने जिंकले, 3 ड्रॉ केले आणि 1 गमावला.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी ग्रँड चेस टूर विजेतेपद जिंकल्याबद्दल प्रज्ञनंदाचे अभिनंदन केले
वाचा @ANI कथा | https://t.co/GjA7Rml11N#RPragnanandaa #GrandChessTour #GCT2026 #बुद्धिबळ pic.twitter.com/4mkVhVeUwU
— ANI डिजिटल (@ani_digital) 28 ऑगस्ट 2026
Comments are closed.