घरातील या वस्तूंवर असतात सर्वाधिक जंतू
आपल्याला नेहमी वाटते की आपले घर अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित आहे. परंतु, आपल्या दैनंदिन वापरातील काही वस्तूंवर टॉयलेटसीट पेक्षाही अधिक प्रमाणात जंतू असतात. टीव्ही रिमोटपासून ते स्वयंपाकघरातील स्पंजपर्यंतच्या या वस्तू आपण दररोज कोणत्याही हाताळतो, ज्यामुळे आजारपणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
दरवाजाचे हँडल, स्विच बोर्ड
घरातील प्रत्येक व्यक्ती वारंवार दरवाजाचे हँडल, कपाटाचे हँडल आणि इलेक्ट्रिक स्विचला हात लावते. त्यामुळे या ठिकाणी धूळ, घाम आणि सूक्ष्मजीव जमा होऊ शकतात. त्यामुळे काही दिवसांनी नियमितपणे या गोष्टी स्वच्छ करायला हव्यात.
मोबाईल, रिमोट
मोबाईल फोन सतत हाताळला जातो आणि तो अनेकदा स्वयंपाकघर, बेडरूम अशा घरात कुठेही ठेवला जातो. टीव्हीचा रिमोटही घरातील अनेक व्यक्ती वापरतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तो स्वच्छ करणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरातील स्पंज, कापड
भांडी घासण्याचा स्पंज आणि किचनचा ओला कपडा सतत ओलसर राहतो. त्यामुळे यावर बॅक्टेरिया वाढू शकतात. हे टाळण्यासाठी स्पंज आणि कापड नियमितपणे धुवून पूर्णपणे वाळवणे गरजेचे आहे.
नळाचे हँडल, फ्रिजचे दार
वरील गोष्टीप्रमाणे नळाचे हँडल आणि फ्रिजच्या दारावरही असंख्य बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. त्यामुळे नियमित काही दिवसांनी या गोष्टी स्वच्छ करणे आवश्यक आहेत.
हेही वाचा – टाईल्सच्या लाईनमध्ये साचलेली घाण कशी स्वच्छ कराल?
घरगुती जंतू, बहुतेक जंतूजन्य वस्तू, टीव्ही रिमोट स्वच्छता, स्वयंपाकघरातील स्पंज जंतू, मोबाईल स्क्रीन स्वच्छता, निरोगी घर, घरातील जंतू, घरगुती वस्तूंवरील जंतू मराठी, रोजच्या साफसफाईच्या टिप्स मराठी
Comments are closed.