अमेरिकेचे व्हेनेझुएलाच्या ६५ अब्ज बॅरल तेलसाठ्यावर नियंत्रण; ट्रम्प म्हणाले, इतिहासातील सर्वात मोठी डील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलासोबत जगातील सर्वात मोठ्या तेल कराराची घोषणा केली आहे. या करारानुसार, अमेरिकेने व्हेनेझुएलातील ६५ अब्ज बॅरलहून अधिक प्रमाणित तेलसाठ्यावर बहुतांश नियंत्रण मिळवले आहे. ट्रम्प यांनी २८ ऑगस्ट रोजी या कराराची माहिती देताना, हा जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा तेल करार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक करारासाठी अमेरिकन करदात्यांचा एकही पैसा खर्च झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर माहिती देताना सांगितले की, त्यांच्या सूचनेनुसार सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो आणि सेक्रेटरी ऑफ वॉर पीट हेगसेथ यांनी व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज आणि खाजगी कंपन्यांसोबत भागीदारी करत हा महत्त्वपूर्ण करार घडवून आणला आहे. या करारामुळे अमेरिकेचा कच्च्या तेलाचा पुरवठा वाढेल आणि परिणामी देशांतर्गत पेट्रोलचे दर कमी होण्यास मोठी मदत मिळेल. तसेच यामुळे अमेरिकेचा तेलसाठा दुप्पट होईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

दुसरीकडे, व्हेनेझुएलानेही या कराराचे स्वागत केले आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे की, या करारामुळे देशाच्या तिजोरीत मोठी भर पडणार असून तेल उद्योगाच्या पायाभूत सुविधांचे नूतनीकरण करण्यासाठी देशात मोठी विदेशी गुंतवणूक येईल. खाजगी कंपन्यांच्या मदतीने देशातील १७ प्रमुख तेल क्षेत्रांचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक आणि व्हेनेझुएला सरकारला २०९ अब्ज डॉलर्सहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.