चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा थाटात, तिरुपतीच्या साजात विराजणार बाप्पा
मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासातील मानाचे पान असलेल्या लालबाग-परळ भागातील ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चा आगमन सोहळा शनिवारी (29 ऑगस्ट) ढोलताशांच्या गजरात, थाटामाटात व ‘चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो’ अशा जयघोषात संपन्न झाला. प्रतिवर्षी प्रमाणे यावेळीही लाखो गणेशभक्त कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते. यंदा मंडळाद्वारे तिरूपती तिरूमला येथील श्री वेंकटेश्वर बालाजीच्या धर्तीवर गणेशमूर्ती सजावट आणि हैदराबाद स्वर्णमंदिर धर्तीवर मंडप परिसर सजावट करण्यात येत आहे. या मंडळ परिसरास तिरूपतीचा साज लाभणार असून यानिमित्ताने लालबाग-परळ परिसर ‘तिरूपती’मय झालेला पाहायला मिळणार आहे.
Comments are closed.