घरकामाचा ताण कमी करायचाय? कुटुंबातील प्रत्येकाकडून अशी घ्या मदत
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरातील संपूर्ण कामाचा भार एकाच व्यक्तीवर आला तर शारीरिक थकवा आणि मानसिक ताण वाढणे स्वाभाविक आहे. घर हे कुटुंबातील सर्व सदस्यांचे असल्याने त्यातील रोजच्या कामांची जबाबदारीही प्रत्येकाने वाटून घेणे काळाची गरज बनली आहे. हल्ली तर घरातील स्त्रीही वर्किंग करत असल्याने तिच्यावर सर्व जबाबदारी ढकलणे योग्य नाही. त्यामुळे आज आपण दररोजच्या कामात कुटुंबातील सर्वांची मदत सहज आनंदाने मिळवण्यासाठी काही सोपे मार्ग उपयोगी जाणून घेऊयात.
घरकाम बनवा टीमवर्क
कामांची विभागणी
रोजच्या कामांची एक सोपी यादी तयार करावी. पाण्याची भांडी भरणे, भाज्या निवडून ठेवणे किंवा डायनिंग टेबल पुसणे यांसारखी लहान कामे प्रत्येकाला त्यांच्या वेळेनुसार वाटून द्यावीत.
मुलांना कामाची सवय
स्वतःची खेळणी आवरणे, कपड्यांची घडी घालणे आणि जेवण झाल्यावर स्वतःची प्लेट बेसिनमध्ये ठेवणे अशा छोट्या सवयींमुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव येते.
एक दिनचर्या करा
कामाची सक्ती न करता ते रोजच्या रुटीनचा भाग बनवावा. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर प्रत्येकाने स्वतःची अंथरूणे घडी घालून ठेवणे हा नियम घरातील सर्वांसाठी समान असावा.
कौतुक करावे
कुटुंबातील कोणत्याही सदस्याने छोटे काम केले तरी त्याचे मनापासून कौतुक करावे. यामुळे ते पुढच्या वेळी स्वतःहून मदत करू शकतात.
10 मिनिटांचा क्लीनअप
रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा नंतर सर्वांनी मोबाईल बाजूला ठेवून 10 मिनिटे एकत्र काम केल्यास किचन आणि हॉल पटकन आवरला जातो आणि झोपण्यास उशीर होत नाही.
अशा प्रकारे रोजच्या या छोट्या सवयींमुळे एकाच व्यक्तीवरचा घरकामाचा ताण कमी होतोच, शिवाय कुटुंबातील सदस्यांमधील बॉंडही मजबूत होतो.
हेही वाचा – घरातील या वस्तूंवर असतात सर्वाधिक जंतू
घरकामाला सांघिक प्रयत्न करा-
Comments are closed.