फ्रिजमध्ये पदार्थ ठेवताना या चुका करताय? पाहा साठवणुकीची योग्य पद्धत
ऋतू कोणताही असो शिजवलेले अन्नपदार्थ किंवा कच्च्या भाज्या खराब होऊ नयेत यासाठी आपण सर्व गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो. पण फ्रिजमध्ये चुकीच्या पद्धतीने ठेवलेले अन्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. चुकीच्या पद्धतीने अन्न साठवल्यास अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि विषबाधा होऊ शकते. त्यामुळे फ्रिजमध्ये अन्नपदार्थ दीर्घकाळ ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.
तापमान
- फ्रिजचे तापमान नेहमी 34°F – 40°F दरम्यान असावे.
- फ्रीझरचे तापमान -18°C किंवा त्याहून कमी असावे.
- तापमान योग्य असल्यास अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत.
कप्प्यांचा योग्य वापर
- वरच्या कप्प्यात लगेच खाण्यासाठी असलेले पदार्थ. जसे शिजवलेल्या भाज्या, दुध आदी.
- त्याखालील कप्प्यात चिकन किंवा मासे झाकून ठेवावेत, जेणेकरून त्याचा रस इतर पदार्थात पडणार नाही.
- बास्केटमध्ये फळे आणि भाज्या ठेवाव्यात.
पदार्थ झाकून ठेवा
- पदार्थ उघडे ठेवल्यास त्यातील ओलावा निघून जातो आणि इतर पदार्थांचा वास त्यात उतरतो.
- अन्न साठवण्यासाठी काचेचे हवाबंद डबे वापरावेत.
गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवू नये
- गरम पदार्थ थेट फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील आतील तापमान अचानक वाढते. यामुळे शेजारी ठेवलेले इतर पदार्थ खराब होऊ शकतात.
- अन्न खोलीच्या तापमानावर झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवावे.
फ्रिज जास्त भरू नये
- हवा खेळती राहण्यासाठी फ्रिजमध्ये थोडी जागा असणे आवश्यक आहे.
- फ्रिज जास्त गच्च भरल्यास थंड हवा व्यवस्थित फिरत नाही, ज्यामुळे अन्न लवकर खराब होते.
महत्त्वाची टीप
आठवड्यातून एकदा फ्रिजची स्वच्छता करावी. जुने किंवा एक्सपायर्ड मसाले, पदार्थ वेळीच फेकून द्यावेत.
हेही वाचा – फ्रिजमध्ये ठेवलेल्या या वस्तूंची चव का बदलते?
Comments are closed.