अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांचा राजीनामा; शेवटच्या दिवशी शेअर केली भावुक पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ३१ ऑगस्ट २०२६ हा त्यांचा अ‍ॅपलचे सीईओ म्हणून शेवटचा दिवस होता. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी टिम कुक अत्यंत भावुक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी सोशल मीडियावर अ‍ॅपलचे कर्मचारी आणि ग्राहकांसाठी एक खास आणि भावुक संदेश शेअर केला आहे.

आपल्या शेवटच्या दिवशी टिम कुक यांनी X वर एक पोस्ट शेअर करत अ‍ॅपल समुदाय, कर्मचारी आणि ग्राहकांचे आभार मानले. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्याकडून त्यांना नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे.

टिम कुक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “उद्या माझे पद बदलेल, परंतु अ‍ॅपल समुदायावर माझे जे प्रेम आहे ते कधीही बदलणार नाही. माझ्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान बनून राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी तुमचा सदैव ऋणी राहीन, आणि आता मी माझ्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.”

टिम कुक यांच्या या निर्णयानंतर जगभरातील तंत्रज्ञान प्रेमी आणि अ‍ॅपल युजर्सकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता अ‍ॅपलची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments are closed.