भाला क्षेपणास्त्र भारतात तयार होणार आहे.

टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्सचा मोठा करार : सैन्याची मारक क्षमता वाढणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान संरक्षण सहकार्याला पुढे नेत भारतीय सैन्याने जॅवलिन रणगाडाभेदी निर्देशित क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी करार केला आहे. तर टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि जॅवलिन जॉइंट वेंचरने भारतात जॅवलिन ऑल अप राउंडच्या (एयूआर) सहउत्पादनावरून सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. जॅवलिन जॉइंट व्हेंचर रॅथियॉन आणि लॉकहीड मार्टिनची भागीदारी आहे.

या करारानंतर आता भारताच जॅवलिन क्षेपणास्त्रांचे उत्पादन केले जाऊ शकणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर महत्त्वपूर्ण संचालन क्षमतांना वाढविण्यासाठी सशस्त्र दलांना मिळालेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांच्या या क्षेपणास्त्रांची खरेदी केली जातेय. अमेरिकेसोबत झालेल्या कराराच्या अंतर्गत भारतीय सैन्य जॅवलिन रणगाडाभेदी क्षेपणास्त्रs खरेदी करणार आहे.

292 कोटी रुपयांचा करार

जॅवलिनला जगातील सर्वोत्तम रणगाडाभेदी प्रणालींपैकी एक मानले जाते. भारत आणि अमेरिकेदरम्यान यासाठी 292 कोटी रुपयांचा करार झाला आहे. याच्या अंतर्गत भारतीय सैन्याला सुमारे 60 जॅवलिन रणगाडाभेदी निर्देशित क्षेपणास्त्रs मिळतील. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि जॅवलिन जॉइंट व्हेंचर दरम्यान झालेल्या करारानंतर आता जॅवलिन क्षेपणास्त्रांचे उत्पादन दोन्ही कंपन्या मिळून भारतातच करणार आहेत. भारताला जॅवलिन मर्यादित संख्येत मिळतील, कारण आपत्कालीन खरेदी व्यवस्थेच्या अंतर्गत एका उपकरणासाठी 300 कोटी रुपयांपर्यंतची खरेदी केली जाऊ शकते.

अमेरिकेच्या राजदूताचे संकेत

अमेरिका दीर्घकाळापासून भारताला जॅवलिन क्षेपणास्त्रs पुरविण्यासाठी प्रयत्नशील होता. अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी या कराराला भारत-अमेरिका संरक्षण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरविले होते. यामुळे भविष्यात दोन्ही देशांदरम्यान जॅवलिनच्या सह-उत्पादनाच्या शक्यता खुल्या होऊ शकतात असे त्यांनी म्हटले होते. नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेच्या विदेश विभागाने भारताला संभाव्य स्वरुपात 100 जॅवलिन प्रणाली आणि 216 एक्सकॅलिबर निर्देशित तोफगोळ विकण्यासाठी 93 दशलक्ष डॉलर्सच्या विक्रीला मंजुरी दिली होती.

जॅवलिन क्षेपणास्त्राची क्षमता

जॅवलिनला मुख्यकरून रणगाडा आणि इतर चिलखती वाहनांना लक्ष्य करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ही एक मध्यम पल्ल्याची, खांद्यावरून डागता येणारी आणि एका सैनिकाकडून संचालित केली जाणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या ‘फार अँड फॉरगेट’ आहे. याचा अर्थ क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर सैनिकाला लक्ष्यावर सातत्याने नजर ठेवण्याची आवश्यकता नसते. जॅवलिन प्रणालीत दोन प्रमुख हिस्से असतात. पहिला कमांड लाँच युनिट असून त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. दुसरा क्षेपणास्त्रयुक्त डिस्पोजेबल लाँच-ट्यूब असेंबली आहे. ही प्रणाली रणगाड्यांसोबत बंकर आणि इतर मजबूत सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे.

Comments are closed.