दिनेश लाड ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026’ ने सन्मानित
‘द्रोणाचार्य’ पुरस्कारप्राप्त नामांकित क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे संस्थापक अध्यक्ष व 184 वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले हिंदुस्थानी डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल आणि अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अशा असामान्य व्यक्तींना दिला जातो ज्यांनी आपल्या कार्यातून समाजात आणि संबंधित क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
दिनेश लाड हे हिंदुस्थानी क्रिकेट जगतातील अत्यंत प्रतिष्ठत नाव आहे. त्यांनी मुंबईतून अनेक जागतिक स्तरावरील क्रिकेटपटू शोधले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून घडवले. हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर हे दिनेश लाड यांचेच शिष्य आहेत. खेळाडू घडवण्यातील त्यांच्या याच अतुलनीय योगदानासाठी त्यांना सरकारतर्फे ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Comments are closed.