Daily Water Intake: दिवसातून किती लिटर पाणी प्यावे?
पाणी म्हणजे शरीरासाठी केवळ तहान भागवणारे पेय नाही तर शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक घटक आहे. दिवसभर कमी पाणी प्यायल्यास डोकेदुखी, थकवा, तोंड कोरडे पडणे किंवा लघवीचा रंग गडद होणे अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे ‘दिवसातून नेमकं किती पाणी प्यावं?’ हा प्रश्न अनेकांना पडतो.
किती पाणी प्यावे?
सर्वांसाठी पाण्याचे एकच ठराविक प्रमाण लागू होत नाही. वय, शरीराचे वजन, शारीरिक हालचाल, हवामान आणि आरोग्याची स्थिती यानुसार शरीराची पाण्याची गरज बदलते. सामान्यतः प्रौढ व्यक्तींना दिवसातून सुमारे 2 ते 3 लिटर एकूण द्रवपदार्थ मिळणे आवश्यक असू शकते. यामध्ये फक्त साधं पाणीच नाही, तर दूध, सूप, ताक तसेच पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्यांमधून मिळणाऱ्या द्रवाचाही समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दररोज अगदी ठराविक लिटर पाणीच प्यावे, असे नाही.
पाणी कमी पडत असल्याची लक्षणे
– वारंवार तहान लागणे
– तोंड आणि ओठ कोरडे पडणे
– लघवीचा रंग गडद होणे
– थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे
– चक्कर येणे किंवा डोकेदुखी होणे
गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे
‘जास्त पाणी म्हणजे जास्त आरोग्य’ असे समजणे चुकीचे आहे. कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील सोडियमची पातळी धोकादायकरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळे तहान, हवामान, शारीरिक हालचाल आणि शरीराची गरज लक्षात घेऊन पाणी पिणे महत्त्वाचे आहे.विशिष्ट आजार असल्यास किंवा डॉक्टरांनी पाण्याचे प्रमाण मर्यादित करण्यास सांगितले असल्यास स्वतःहून पाणी वाढवू नये.
पाणी पिण्याचे ‘एकच योग्य प्रमाण प्रत्येकासाठी नसते. तुमची दिनचर्या, हवामान आणि शरीराची गरज यानुसार प्रमाण बदलू शकते.
Comments are closed.