‘खो’ –  मनाच्या अंधारातला अस्वस्थ करणारा शोध

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रंगभूमीवर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा खोलवर वेध घेण्यासाठी भव्य नेपथ्य, अनेक व्यक्तिरेखा किंवा मोठा पसारा आवश्यक नसतो. एक समर्थ लेखणी, एक कसदार अभिनेत्री आणि मनाला भिडणारा विषय एवढाच पुरेसा असतो. याची प्रचीती प्रवीण धोपट लिखित ‘खो’ या नव्या एकुलत्या एका नाट्यप्रयोगातून येते.

‘माध्यम कला मंच’ निर्मित या नाटकाची कथा एका दुर्दैवी आणि आव्हानात्मक प्रसंगानंतर स्वतःला सावरण्यासाठी धडपडणाऱ्या ‘ती’च्या मानसिक संघर्षाभोवती गुंफलेली आहे. तिच्या मनातील अस्वस्थता, नात्यांमधील गुंतागुंत आणि सामाजिक वास्तव यांचा शोध घेताना लेखक प्रेक्षकांनाही आत्मपरीक्षणाच्या वाटेवर घेऊन जातात.

डॉ. अनिल बांदीवडेकर यांच्या दिग्दर्शनाखाली जान्हवी दरेकर यांनी साकारलेली एकमेव व्यक्तिरेखा हे या प्रयोगाचे प्रमुख बलस्थान ठरते. त्यांच्या अभिनयातील भावछटा आणि अंतर्मुख करणारी देहबोली व्यक्तिरेखेची घुसमट प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. शरद वेटे यांच्या पार्श्वसंगीताने वातावरणनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘खो’ संपते, पण तिचे प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात बराच काळ रेंगाळत राहतात आणि त्यांच्यासोबतच घरी जातात.

Comments are closed.