असं झालं तर…पोस्ट ऑफिसमधील खाती बँकेत ट्रान्सफर करायची आहे…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्या पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे खाते आहे, तिथे जाऊन खाते हस्तांतरण अर्ज भरा. अर्जामध्ये ज्या बँक आणि शाखेत खाते ट्रान्सफर करायचे आहे त्याचा संपूर्ण पत्ता व तपशील लिहा.

अर्जासोबत तुमच्या खात्याचे मूळ पासबुक, केवायसी (KYC) साठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखपत्र/पत्ता पुरावा जोडा.

पोस्ट ऑफिसच्या नियमांनुसार,एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते ट्रान्सफर करण्यासाठी 100 अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाते.

पोस्ट ऑफिस कागदपत्रांची पडताळणी करून जुने खाते बंद करते आणि शिल्लक रक्कम व सर्व कागदपत्रे तुम्ही निवडलेल्या बँकेकडे पाठवते.

ज्या बँकेत खाते ट्रान्सफर करायचे आहे त्या बँकेच्या शाखेत जाऊन नवीन KYC व खाते सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

Comments are closed.