भारत फिरताना या 10 वस्तू घरी आणायला विसरू नका; प्रत्येक राज्याची खास ओळख एका क्लिकवर

भारत फिरताना प्रत्येक राज्याची संस्कृती, कला आणि परंपरा वेगळी अनुभवायला मिळते. त्यामुळे प्रवासातून परतताना तिथल्या खास वस्तू घरी आणण्याची मजाच काही और असते. या वस्तू फक्त शॉपिंगपुरत्या मर्यादित नसून त्या त्या ठिकाणची ओळखही जपतात.

१. महाराष्ट्र – कोल्हापुरी चप्पल
महाराष्ट्रातून पारंपरिक कोल्हापुरी चप्पल नक्की घ्या. हाताने बनवलेली ही चप्पल पारंपरिक आणि स्टायलिश दोन्ही लूकसाठी छान पर्याय आहे.

2. गोवा – शेल ज्वेलरी
गोव्याची शेल ज्वेलरी समुद्रकिनाऱ्याच्या वातावरणाची आठवण करून देते. नेकलेस, ब्रेसलेट किंवा कानातले असा पर्याय तुम्ही घेऊ शकता.

3. गुजरात – हँडमेड बॅग्स
गुजरातच्या हस्तकलेचा सुंदर नमुना असलेल्या हँडमेड बॅग्स प्रवासाची खास आठवण ठरू शकतात. रंगीबेरंगी डिझाइन्स त्यांना आकर्षक बनवतात.

4. दिल्ली – ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी
दिल्लीच्या बाजारातून ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी घेता येते. ट्रेडिशनल आणि वेस्टर्न अशा दोन्ही आउटफिट्ससोबत ती छान दिसते.

५. पंजाब – पारंपारिक परांडा
पंजाबची ओळख असलेला पारंपरिक परांदा केसांसाठी सुंदर अॅक्सेसरी आहे. रंगीत आणि आकर्षक परांदा लूकला पंजाबी टच देतो.

6. वाराणसी – बनारसी सिल्क साडी
वाराणसीला गेल्यावर बनारसी सिल्क साडी घेण्याचा मोह आवरणं कठीणच. तिची पारंपरिक विणकामाची शैली आणि आकर्षक डिझाइन खास आहे.

७. तेलंगणा – लाख बांगड्या
तेलंगणातून रंगीबेरंगी लाख बांगड्या घेऊन या. पारंपरिक पोशाखासोबत त्यांचा लूक अधिक खुलून दिसतो.

8. काश्मीर – पश्मिना शाल
काश्मीरची पश्मीना शाल तिच्या नाजूकपणा आणि सुंदर विणकामासाठी प्रसिद्ध आहे. थंडीपासून बचावासोबत ती एलिगंट लूकही देते.

९. नागालँड – हँडमेड बांबू क्राफ्ट्स
नागालँडमधील बांबूपासून बनवलेल्या हस्तकला वस्तू घराच्या सजावटीसाठी सुंदर पर्याय आहेत. त्यातून स्थानिक कलाकुसरीची झलकही मिळते.

10. केरळ – स्पाइस बॉक्स
केरळमधून मसाल्यांचा बॉक्स आणला तर घरबसल्या केरळच्या चवीची आठवण ठेवता येते. विविध सुगंधी मसाले याला खास बनवतात.

प्रवासातून आणलेल्या वस्तू केवळ शॉपिंगपुरत्या मर्यादित नसतात, तर त्या त्या ठिकाणच्या संस्कृतीची आणि आठवणींची सुंदर झलक असतात. त्यामुळे पुढच्या वेळी भारतातील वेगवेगळ्या राज्यांना भेट देताना या खास वस्तू घरी आणायला विसरू नका.

Comments are closed.