मासिक पाळीत गरम पाणी पिणं योग्य की अयोग्य?
मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना पोटदुखी, कंबरदुखी आणि थकवा यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या दिवसात शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचं असतं. अनेक महिला या दिवसांत गरम किंवा कोमट पाणी पिणे पसंत करतात. पण मासिक पाळीत गरम पाणी पिणं खरोखरच फायदेशीर आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते या दिवसांत कोमट पाणी पिणे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्यंत आरोग्यदायी आहे.
क्रॅम्प्सपासून आराम
गरम पाण्यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि मासिक पाळी दरम्यान येणारे तीव्र क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया राहते नीट
या दिवसांत हार्मोनल बदलांमुळे अनेकदा गॅस, अपचन किंवा बद्धकोष्टतेचा त्रास होतो. नियमित कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था व्यवस्थित काम करते.
ब्लॉटिंग कमी होते
मासिक पाळीत शरीर फुगल्यासारखे वाटणं किंवा सुज येणं ही सामान्य समस्या आहे. परंतू, पुरेसं कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि ब्लॉटिंग कमी होते.
थकवा दूर होतो
कोमट पाण्यामुळे शरीराला एक प्रकारची ऊर्जेची अनुभूती मिळते, ज्यामुळे या दिवसांतील मानसिक तणाव आणि थकवा दूर पळण्यास मदत होतो.
ही काळजी घ्या
मासिक पाळीत जास्त कडक किंवा उकळते पाणी पिऊ नये, तर नेहमी कोमट पाणीच प्या. तसेच पाण्यात थोडे आले किंवा ओवा टाकून उकळल्यास वेदनांपासून अधिक जलद आराम मिळतो.
हेही वाचा – Sleep Kit: शांत झोपेसाठी स्लीप किट
Comments are closed.