डीएमध्ये ३% वाढ होण्याची शक्यता आहे

49 लाख केंद्रीय कर्मचारी, 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार फायदा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सुमारे 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात/महागाई सवलतीत (डीए) तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर, सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 1 जुलैपासून महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सध्या 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. आता या तीन टक्क्यांच्या वाढीमुळे हा दर 63 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे संकेत अर्थ मंत्रालयातील सूत्रांकडून मिळत आहेत.

केंद्र सरकारने गेल्यावर्षी 1 जुलैपासून आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर हा दर 58 टक्क्यांवर पोहोचला होता. 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता दरात दोन टक्क्यांच्या वाढीमुळे, हा दर 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यानंतर आता वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पुन्हा 3 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.