स्वतंत्र भारद्वाजची पोलिस कोठडीत रवानगी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनाच्या वेळी एका आंदोलकाच्या पित्याला मारहाण केल्याची बढाई एका पॉडकास्टमध्ये मारलेला स्वतंत्र भारद्वाज याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली होती. शनिवारी त्याला दिल्लीत न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. भारद्वाज याला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित करण्यात आले नाही. त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आणण्यात आले. या संदर्भात आंदोलकाचे वकील रिशव रंजन यांनी नाराजी व्यक्त केली. तक्रारदार न्यायालयात उपस्थित असताना आरोपी न्यायालयात न येता स्वत:ची बाजू व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मांडतो, हे योग्य नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच भारद्वाज याला केवळ एका दिवसाची कोठडी दिल्याच्या संदर्भातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारद्वाज याने गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात अधिक कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे या वकीलाचे म्हणणे होते. तथापि, न्यायालयाने एक दिवसाची कोठही दिली.

Comments are closed.