Photo – माँसाहेबांचा स्मृतिदिन! उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनी केले अभिवादन
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. (सर्व फोटो – रुपेश जाधव)

माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील प्रतिमेस अभिवादन केले.

यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, उपनेत्या विशाखा राऊत, उपनेत्या ज्योती ठाकरे, आमदार महेश सावंत, आमदार बाळा नर, माजी महापौर विभागसंघटक श्रध्दा जाधव, शिवसेना सचिव ॲड. साईनाथ दुर्गे, नगरसेवक निशिकांत शिंदे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी 7 वाजल्यापासून भक्तिगीत, सुगम संगीत, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments are closed.