नेपाळच्या डोंगराळ भागात पूर, नदी खोऱ्यात अलर्ट; आतापर्यंत १३४४ मृत्यू, ५ हजार बेपत्ता
नेपाळच्या डोंगराळ गोरखा जिल्ह्यात रविवारी सकाळी थेरांग नदीला पूर आला. त्यानंतर प्रशासनाने बुढीगंडकी नदीच्या खोऱ्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुराच्या पाण्यामुळे चार घरे आणि एक लटकता पूल (सस्पेन्शन ब्रिज) वाहून गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाण्याची पातळी वाढत असल्याचे समजताच रहिवाशांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. २६ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात मृत्यू झालेल्या नागरिकांचे आतापर्यंत १,३४४ मृतदेह सापडले आहेत, तर सुमारे ५,००० लोक अजूनही बेपत्ता आहेत.
Comments are closed.