पत्नी नांदायला येत नाही म्हणून मोबाईल टॉवरवर चढला, नांदेडमध्ये पतीची ‘विरु’गिरी, पहा Video

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने थेट मोबाईल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केल्याची एक अजब घटना नांदेडमध्ये घडली आहे. शादुल मकदुम दौलताबादी (रा. बेटमोगरा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या आंदोलनकर्त्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शादुल यांचा विवाह 19 एप्रिल 2024 रोजी वसरणी (नांदेड) येथे लोहा येथील रहिवासी असलेल्या आफीया गफार घोडके हिच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच कौटुंबिक वादामुळे पत्नी माहेरी निघून गेली आणि तिने परत नांदायला येण्यास नकार दिला. शादुल यांनी सासुरवाडी असलेल्या लोहा येथे जाऊन पत्नीला परत आणण्यासाठी यापूर्वीही अशाच प्रकारचे अनोखे आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी अत्यंत सीताफीने त्याला समजावून सांगत खाली उतरवले आणि पोलीस ठाण्यात आणले होते.

मात्र, तरीही पत्नी परत न आल्याने शादुल यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला. त्यांनी बस स्टँड जवळील एका मोबाईल टॉवरवर आपल्या पत्नीच्या फोटोचे बॅनर लावले आणि थेट टॉवरच्या टोकावर जाऊन बसले. ‘पत्नी नांदायला येत नाही’ असा आरडाओरडा करत त्यांनी टॉवरवरूनच सर्व परिसराचे लक्ष वेधून घेतले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली असून शादुल यांची ही स्टंटबाजी आणि पत्नीला परत मिळवण्यासाठीचा हा ‘दुसरा प्रयत्न’ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments are closed.