गणेशोत्सवाच्या तयारीसाठी भाविकांची लगबग; रोषणाई अन् रंगीबेरंगी फुलांनी, सजले मुंबईचे मार्केट
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात दादरच्या प्रसिद्ध फुल मार्केटमध्ये बाप्पाच्या सजावटीसाठी आणि पूजेसाठी फुलांची मोठी आवक आणि खरेदीची जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या फुलांच्या खरेदीसाठी पहाटेपासूनच बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना खरेदीसाठी मुंबईतील प्रमुख बाजार पेठांमध्ये मोठी झुंबड उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (5 सप्टेंबर) आणि रविवारी (6 सप्टेंबर) मुंबईच्या दादरमध्ये मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. (फोटो सौजन्य – दीपक साळवी) Ganeshotsav 2026
Comments are closed.