जुळ्या मुलींच्या जन्माच्या त्या क्षणी आनंदाने रडले आदित्य सील, अनुष्का रंजनने शेअर केला हा खास व्हडिओ – Tezzbuzz

अभिनेत्री अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि गोड क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या जोडप्याने त्यांच्या जुळ्या मुलींच्या जन्मावेळीचा रुग्णालयातील एक सुंदर क्षण शेअर केला आहे. आपल्या मुलींच्या जम्नाची बातमी ऐकुन दोघेही भावुक झाले होते आणि तो क्षण या व्हिडिओ मध्ये कैद झाला आहे. आणि या आंदनमयी व्हिडीओ पाहुन चाहते खुश झाले आहेत.

अनुष्का (anushka)आणि आदित्य सील यांनी हा व्हीडिओ मंगळवार 8 सप्टेंबर रोजी सोशल मिडीयावर शेअर केला होता. आणि व्हिडिओच्या थंबनेलला बाळांची फोटो आहेत. तसेच या जोडप्याने पोस्टला ‘आणि त्या इथे आहेत’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओची सुरुवात अनुष्काला रुग्णालयातील प्रसुती कक्षात व्हिलचेअरमधुन आणले जात असताना होते. त्यावेळी आदित्यही तिथे उपस्थित असतो. त्यानंतर अनुष्काला स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते आहे.

हा व्हिडिओमधील सर्वात भावनिक क्षण तेव्हा येतो, जेव्हा आदित्य आपल्या जुळ्या मुलींच्या जन्मानंतर बाहेर येतो आणि त्याचा चेहरा हा आंनदाने भरलेला आहे. तो आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तो आपल्या कुटुंबाला हात हलवतो. त्यानंतर तो आपल्या कुटुंबीयांना भेटतो आणि त्यांना मिठी मारतो आहे. तसेच त्यावेळी त्याचे डोळ्यातुन आंनद आश्रु येत आहेत.

अनुष्का आणि आदित्यने 23 ऑगस्ट 2026 रोजी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या जुळ्या मुलींच्या जन्माची घोषणा केली. त्यांनी त्यांची नावे वीरा रंजन सील आणि माही रंजन सील अशी सांगितली. आणि या पोस्टला त्यांच्या चाहत्याने उत्तम प्रतिसाद देत अनेक भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा
पंचायत 5च्या रिलीजबाबत मोठी अपडेट, या सीजनमध्ये फुलेराची कथा घेणार नवं वळण

Comments are closed.