IPL 2027 मध्येही खेळणार एमएस धोनी? चेन्नईच्या खेळाडूचा मोठा खुलासा!

आयपीएल 2027 पूर्वी एमएस धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल कारकिर्दीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या चाहत्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत की, धोनी IPL 2027 मध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार का? धोनीकडून सध्या याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, CSKचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने (Akash Madhwal on MS Dhoni) धोनी पुढील हंगामात खेळण्याबाबत विश्वासाने आपले मत व्यक्त केले आहे.

आकाशने सांगितले की, आयपीएलच्या पुढील हंगामात खेळायचे की नाही, याचा निर्णय माही भाई स्वतः घेतील. मात्र, त्याने धोनीला ज्या पद्धतीने सराव करताना पाहिले आहे, त्यावरून त्याला वाटते की, धोनी पुढील हंगामातही खेळताना दिसतील.

आकाशच्या म्हणण्यानुसार, CSKच्या कॅम्पमध्ये आल्यानंतर धोनीने आतापर्यंत एकही सराव सत्र चुकवलेले नाही. तो सातत्याने फलंदाजीचा सराव करत आहे आणि सरावादरम्यान पूर्ण मेहनत घेत आहे. यामुळे आकाशला वाटते की, धोनी सध्या आयपीएलपासून दूर जाण्याच्या मनःस्थितीत नाही.

धोनीच्या तयारीबाबत बोलताना आकाशने सांगितले की, त्याची फिटनेस पाहून त्याला पूर्ण विश्वास आहे. त्याने तर आयपीएल 2027 मध्ये धोनी खेळणार याची 100 टक्के खात्री असल्याचेही म्हटले आहे. मात्र, हे आकाशने व्यक्त केलेले मत आहे. धोनीकडून आयपीएल 2027 खेळण्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

म्हणजेच, सध्या धोनी पुढील हंगामात खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय बाकी आहे. मात्र, CSKच्या या खेळाडूचे वक्तव्य माहीला पुन्हा एकदा मैदानावर पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.

आकाशने संघातील धोनीच्या वागण्याबद्दलही सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, धोनी खूप शांत स्वभावाचा आहे आणि खेळाडू त्याच्याशी सहजपणे आपल्या मनातील गोष्ट बोलू शकतात. कोणाला काही अडचण किंवा प्रश्न असल्यास ते धोनीचा सल्ला घेऊ शकतात. धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे हा युवा खेळाडूंसाठी एक खास अनुभव आहे. त्याच्या उपस्थितीचा संघालाही मोठा फायदा होतो.

या प्रश्नाचे अधिकृत उत्तर अद्याप धोनीकडून मिळणे बाकी आहे. मात्र, त्याचा सातत्याने सुरू असलेला सराव आणि फिटनेस पाहता आकाश मधवालला पूर्ण विश्वास आहे की, माही IPL 2027 मध्येही खेळताना दिसेल. आता चाहत्यांना फक्त धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Comments are closed.