TVK-काँग्रेस आघाडीला नवे नाव मिळाले.

‘सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्ट्री अलायन्स’ची घोषणा : बैठकीस डावे पक्ष अनुपस्थित

वृत्तसंस्था, चेन्नई

तामिळनाडूत अभिनेता विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कझगमच्या (टीव्हीके) नेतृत्वाखालील आघाडीच्या नावाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. या आघाडीच्या नावात ‘सेक्युलर’, ‘सोशल जस्टिस’ आणि ‘क्हिक्ट्री’ यासारख्या शब्दांना  प्राधान्य देण्यात आले आहे. आघाडीच्या नावाचा निर्णय बुधवारी चेन्नईच्या पनैयूर येथील टीव्हीके मुख्यालयात झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आला. बैठकीत काँग्रेस, व्हीसीके, एमडीएमके आणि आययुएमएलचे प्रमुख नेते सामील झाले.

या महत्त्वाच्या बैठकीपासून डाव्या पक्षांनी मात्र अंतर राखले आहे. सरकारला पाठिंबा देणाऱ्या माकप अन् भाकपचे नेते बैठकीत सामील झाले नाहीत. या आघाडीत काँग्रेस, व्हीसीके, एमडीएमके आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) देखील सामील आहे.

बैठकीनंतर समोर आलेल्या छायाचित्रात टीव्हीके प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री विजय, व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलन, एमडीएमके प्रमुख वायको आणि आययुएमएलचे नेते दिसून आले. सर्व नेत्यांनी एकजूटता दाखवत आघाडीबद्दल समर्थन दर्शविले.

बैठकीत काँग्रेसच्या वतीने माणिकम टागोर, थरगई कथबर्ट आणि प्रवीण चक्रवर्ती सामील झाले. तर व्हीसीकेच्या वतीने थोल थिरुमावलन यांच्यासह वन्नी अरसु, रवि कुमार आणि सिंथनाई सेल्वन उपस्थित होते. एमडीएमकेच्या वतीने पक्षप्रमपुख वायको आणि दुरई वायको यांनी बैठकीत भाग घेतला. आययुएमए लच्या वतीने केएम कादर मोहिदीन आणि शाहजहां बैठकीत सामील झाले.

या बैठकीचा मुख्य अजेंडा आघाडीच्या संरचनेला औपचारिक रुप देणे होता. नेत्यांनी आघाडीचे कामकाज आणि भविष्याच्या रणनीतिवरून अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. बैठकीत संयुक्त किमान कार्यक्रम तयार करणे, आघाडीसाठी संचालन समिती स्थापन करणे, संयोजक नियुक्त करणे आणि आघाडीच्या अधिकृत नावाला अंतिम रुप देण्यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

Comments are closed.