'वंदे मातरम'च्या वेळी काँग्रेस आमदार बसून राहिले.
गांधीनगर:
गुजरात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळाचा राहिला. सभागृहात एकीकडे ‘वंदे मातरम्’च्या अपमानाचा वाद तापला तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी सभागृहाबाहेर महागाई आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर निदर्शने केली. अधिवेनशाच्या प्रारंभी परंपरेनुसार राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’चे गायन सुरू असताना काँग्रेस आमदार इमरान खेडावाला हे स्वत:च्या सीटवर बसून राहिल्याने वाद निर्माण झाला. या प्रकरणी भाजपने तीव्र विरोध करत याला मातृभूमी आणि राष्ट्रगीताचा अपमान ठरविले. आमदाराने हे कृत्य जाणूनबुजून केले होते का हे स्पष्ट करावे, चुकून झालेले असल्यास काँग्रेस आमदाराने माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात अशाप्रकारचा अपमान गुजरातची जनता सहन करणार नाही. विधानसभेच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. आम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेत याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करणार आहोत असे भाजप आमदार महेश कसवाला यांनी म्हटले आहे.
Comments are closed.