उपांत्य फेरीत हिंदुस्थानपुढे बांगलादेशचे आव्हान
विजयाची हॅटट्रिक साधल्यानंतर हिंदुस्थानचा संघ आता बांगलादेशबरोबर दोन हात करणार आहे. महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थानने विजयात सातत्य राखले तर त्यांच्यासाठी अंतिम फेरीचे दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे आता या उपांत्य फेरीच्या सामन्यात हरमनप्रीत कौर ही विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले
हिंदुस्थानच्या संघाने ‘अ’ गटामध्ये अव्वल स्थान पटकावले. हिंदुस्थानने थायलंड, हाँगकाँग आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले होते. बांगलादेश गट ‘अ’ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. या दोन संघांमधील सामन्याचा विजेता आता अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल, तर पराभूत संघाचा प्रवास तिथेच संपेल.
स्मृती–शेफाली डावाची सुरुवात करतील
स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा पुन्हा एकदा डावाची सुरुवात करू शकतात. स्मृतीने या स्पर्धेत सातत्याने दमदार कामगिरी केली होती. दोन्ही फलंदाज उत्पृष्ट फॉर्ममध्ये आहेत. शेफालीने पाकिस्तानविरुद्ध एक विकेटही घेतली होती. प्रतिका रावलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. रावलने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केलेली नाही. त्यामुळे तिला उपांत्य फेरीत स्वतःला सिद्ध करायचे असेल. कर्णधार हरमनप्रीत कौरची चौथ्या क्रमांकावर आणि भारती फुलमालीची पाचव्या क्रमांकावर खेळायला येतील. रिचा घोषला पुन्हा एकदा यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते. दीप्ती शर्मा आतापर्यंत दमदार अष्टपैलू कामगिरी करत आहे. प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड आणि नंदनी शर्मा गोलंदाजीची जबाबदारी देण्यात येणार आहे.
हिंदुस्थानचा संघ : स्मृती मानधना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत काwर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा, गुनालन कमलिनी, रेणुका सिंह ठापूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
Comments are closed.