टी20 नाही! तिलक वर्माने खुलासा केला त्याच्या आवडत्या फॉरमॅटचा, म्हणाला, “हा माझा सर्वात…”

तिलक वर्मा सध्या दुलीप ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेत तो दक्षिण विभागाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेच्या आपल्या तिन्ही डावांमध्ये तिलकने लक्षवेधी खेळी केली आहे. त्याने 116*, 51* आणि 99 धावांच्या खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तसेच संघाला अंतिम सामन्यात पोहोचवल्याने त्याचे नेतृत्वही चर्चेत आले आहे.
चेन्नईमध्ये दुलीप ट्रॉफी 2026 चा अंतिम सामना सुरू आहे. यामध्ये दक्षिण विभागासमोर पूर्व विभागाचे आव्हान आहे. या सामन्यात इशान किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाचे जेतेपद पक्के असून तिलकच्या कामगिरीला मागे टाकून चालणार नाही.
टी20 क्रिकेटमध्ये अनेक मैदाने गाजवणारा तिलक आगामी मालिकेसाठी सज्ज आहे. या आठवड्याच्या शेवटी दिल्लीत भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका जिंकण्याचे धेय्य असल्याचे तिलकने सांगितले, मात्र रेड बॉलकडून व्हाईट बॉलकडे वळण्यासाठी मानसिक आणि तांत्रिकरित्या बदल करण्यास काही दिवसांचा कालावधी त्याला मिळणार असून तो या मालिकेत चांगली कामगिरी करेल असा त्याला आत्मविश्वास आहे.
“माझा फॉर्म चांगला आहे, मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे मला माझा खेळ पुन्हा बदलायला हवा आणि त्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे,” असे तिलकने बुधवारी सामन्याचा चौथा दिवस संपल्यानंतर सांगितले
“अफगाणिस्तान मालिका जिंकणे हे माझे ध्येय आहे. त्यामुळे मी त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरेन,” असेही तिलक पुढे म्हणाला आहे.
यावेळी तिलकने रेड बॉलकडून टी20 मोडमध्ये येणे सोपे काम नसेल याबाबत म्हटले, “हे इतके सोपे नसणार, पण आम्हाला सरावासाठी दोन दिवस मिळाले आहेत. मी याआधीही रणजी ट्रॉफी खेळले आणि तिथून आंतरराष्ट्रीय व्हाईट बॉलचे सामने खेळले आहेत. तेव्हा परिस्थितीशी जुळवून घेतले होते. आताही मिळणारे दोन दिवस सरावासाठी पुरेसे असून मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आहे.”
तिलकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने टी20 क्रिकेटचे खेळले आहेत, मात्र त्याचा आवडता फॉरमॅट रेड बॉल क्रिकेट आहे. त्याने 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8 शतके, 6 अर्धशतके आणि 55.77 च्या सरासरीने 1729 धावा केल्या आहेत.
“मी माझ्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात रेड बॉल क्रिकेटने केली आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून मी व्हाईट बॉल क्रिकेट अधिक खेळलो आहे. तरीही रेड बॉल क्रिकेट माझे सर्वाधिक आवडता फॉरमॅट आहे”, असे तिलकने म्हटले आहे.
“भारतासाठी लाल चेंडूचे क्रिकेट खेळणे हे माझे सर्वात मोठे लक्ष्य आहे, कारण मला रेड-बॉल क्रिकेट खूप आवडते. लहानपणी मला वाटायचे की आधी टेस्ट क्रिकेट खेळायचे आणि त्यानंतरच व्हाईट-बॉल क्रिकेट खेळायचे. मला रेड-बॉल क्रिकेट खेळण्याची खूप इच्छा आहे. मी खूप व्हाईट-बॉल क्रिकेट खेळलो आहे, पण रेड-बॉल क्रिकेट हा आजही माझा आवडता फॉरमॅट आहे,” असे तिलकने त्याच्या आवडत्या फॉरमॅटबाबत सांगितले आहे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी20 मालिकेचा पहिला सामना 13 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. यामध्ये तिलक कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असणार आहे. (Tilak Varma reveals his favourite cricket format but it’s not T20)
Comments are closed.