गुलाबी स्वेटरमध्ये डिंपल, डेनिम जॅकेटमध्ये अखिलेश यादव; AI रेट्रो फोटो सोशल मीडियावर चर्चेत – TMarathiNews
लखनौ: सध्या सोशल मीडियावर 1980 च्या दशकातील रेट्रो लूक तयार करण्याचा AI फोटो ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेक जण या ट्रेंडमध्ये आपले फोटो शेअर करत आहेत. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि त्यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा AI-निर्मित रेट्रो फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अखिलेश यादव यांच्या एका चाहत्याने सोशल मीडिया अकाउंटवर दोघांचा 80s स्टाईलमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अखिलेश यादव आणि डिंपल यादव कॉलेजच्या दिवसांतील लूकमध्ये दिसत आहेत. फोटोसोबत जुन्या आठवणींना उजाळा देणारे कॅप्शनही देण्यात आले आहे.
फोटोमध्ये डिंपल यादव गुलाबी रंगाचा ऊनी स्वेटर, जीन्स आणि हातात डायरी घेऊन दिसत आहेत. त्या अखिलेश यादव यांच्याकडे पाहताना दिसतात. तर अखिलेश यादव डेनिम जॅकेट आणि जीन्स परिधान करून, हातात डायरी आणि मनगटावर घड्याळ घातलेल्या अवस्थेत डिंपल यांच्याकडे पाहताना दिसत आहेत.
चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव
हा फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या जोडीचे कौतुक करत त्यांना ‘बेस्ट कपल’ म्हटले आहे, तर अनेकांनी हार्ट इमोजीद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही चाहत्यांनी अखिलेश आणि डिंपल यांना उत्तर प्रदेशातील लोकप्रिय जोडी म्हणूनही संबोधले आहे.
काय आहे 80s AI फोटो ट्रेंड?
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि X यासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या 1980 च्या दशकातील रेट्रो फोटो तयार करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्याच्या छायाचित्राला त्या काळातील कपडे, हेअरस्टाइल, अॅक्सेसरीज, पार्श्वभूमी, प्रकाशयोजना आणि कॅमेरा इफेक्ट देऊन जुना लूक तयार केला जातो.
या ट्रेंडमध्ये व्यक्तीच्या चेहऱ्याची ओळख कायम ठेवून फोटोला विशिष्ट काळातील रेट्रो शैली देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जुन्या काळातील आठवणींच्या शैलीत तयार झालेले AI फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
Comments are closed.