पराभव दिसताच ट्रम्प यांनी खेळले ‘मनी कार्ड’, मध्यावधी निवडणूक जिंकल्यास प्रत्येक मतदाराला मिळणार 5 हजार डॉलर्स

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यावधी निवडणुकांमध्ये पराभव समोर दिसताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मनी कार्ड’ खेळले आहे. निवडणुका जिंकल्यास प्रत्येक अमेरिकन मतदाराला 5 हजार डॉलर म्हणजे सुमारे 4.76 लाख रुपये देण्यात येतील, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. या योजनेला ‘ट्रम्प डिव्हिडंड’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, ही रक्कम अमेरिकेतच खर्च करावी लागेल, ही अट ठेवण्यात आली आहे.

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत. त्यात प्रतिनिधी सभा आणि सिनेटसाठी खासदारांची निवड होते. इप्सॉस-एएपीआय या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ट्रम्प यांचा पक्ष पराभूत होण्याची शक्यता 65 टक्के एवढी आहे. तसे झाल्यास ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक खासदारांचा विरोध सहन करावा लागू शकतो.

  • ट्रम्प यांनी डॅलस येथील रिपब्लिकन मध्यावधी अधिवेशनात ही घोषणा केली. पक्ष प्रतिनिधी सभा आणि सिनेट या दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यास मतदारांना 5 हजार डॉलर मिळतील, असे जाहीर केले.

128 लाख कोटी रुपये वाटणार

अमेरिकेत एकूण 26.98 कोटी मतदार आहेत. सर्वांना 5 हजार डॉलर दिल्यास सुमारे 1.35 ट्रिलियन डॉलर म्हणजे सुमारे 128.25 लाख कोटी रुपये एवढा खर्च होईल. ही रक्कम जगातील सुमारे 162 देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी आहे. पाकिस्तानच्याही एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा 3.3 पटीने ही रक्कम जास्त आहे.

1.8 ट्रिलियन डॉलरची तूट, तरीही पैसे वाटणार

ही योजना लागू करण्यासाठी ट्रम्प यांना संसदेची मंजुरी घ्यावी लागेल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत तब्बल 1.8 ट्रिलियन डॉलर एवढी तूट आहे. तरीही एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची ट्रम्प यांची योजना आहे. त्यामुळे ट्रम्प यांना टीकेला सामोरे जावे लागू शकते. तर, या योजनेचा लाभ श्रीमंतांना मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments are closed.