टीम इंडियाला मोठा धक्का; सपोर्ट स्टाफमधील ‘या’ सदस्याचा राजीनामा, कारण आलं समोर

अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका महत्त्वाच्या सदस्याने राजीनामा दिला आहे. टीम इंडियाचे फिजिओ कमलेश जैन यांनी बीसीसीआयकडे (BCCI) आपला राजीनामा सादर केला आहे, तरीही बोर्डाने तो अद्याप स्वीकारलेला नाही. ते सध्या भारतीय संघासोबत नवी दिल्लीत आहेत.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, कमलेश जैन यांनी बोर्डाकडे राजीनामा पत्र सोपवले आहे. राजीनामा दिला असला तरी, ते पुढील काही महिने टीम इंडियासोबत काम करत राहतील. जैन जून 2022 मध्ये भारतीय संघाचे फिजिओ बनले होते. ते सध्या तीन महिन्यांच्या नोटीस पिरियडवर आहेत आणि बोर्डाकडून कार्यमुक्त होण्याची वाट पाहत आहेत. परिणामी, ते न्यूझीलंड दौऱ्यावर संघासोबत जाऊ शकतात (जो दौरा डिसेंबरच्या सुरुवातीला संपेल) हा दौरा टीम इंडियासोबतची त्यांची शेवटची कामगिरी ठरू शकते.
कमलेश जैन यांच्या राजीनाम्यामागे सततचा प्रवास हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. लहान मुलांचे कुटुंब असल्याने त्यांना सततचा प्रवास टाळायचा आहे आणि म्हणूनच त्यांनी टीम इंडियातील आपली भूमिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे. बीसीसीआयने या प्रकरणाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
चेन्नईचे रहिवासी असलेल्या कमलेश जैन यांनी नितीन पटेल यांच्या जागी भारतीय संघाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. नितीन पटेल हे बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रुजू झाले होते. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबत काम करत असताना बीसीसीआयने जैन यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी राहुल द्रविड हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते.
एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कमलेश जैन गेल्या साडेचार वर्षांपासून भारतीय संघासोबत आहेत. टीम इंडियासोबत काम करण्याचा अनुभव त्यांना आवडला असला तरी, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना सततचा प्रवास टाळायचा आहे. त्यामुळे, टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधून राजीनामा देणाऱ्या किंवा पद सोडणाऱ्या सदस्यांच्या यादीत कमलेश जैन यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.