आपले मतभेद मिटवून पुढे जाऊया!

मोदी-जिनपिंग द्विपक्षीय चर्चेत वाद टाळण्यावर भर : तीन परस्पर सहमती तत्त्वेही निश्चित

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक केली. ही बैठक सुमारे 50 मिनिटे चालली. मतभेदांचे वादात रुपांतर होता कामा नये आणि संबंध दीर्घकाळ टिकले पाहिजेत यावरही मोदी आणि जिनपिंग सहमत झाले. दोन्ही देशांमधील संबंध आदर, संवेदनशीलता आणि परस्पर हित या तीन ‘परस्पर तत्त्वां’वर आधारित असले पाहिजेत, यावर पंतप्रधान मोदी यांनी जोर दिला. शी जिनपिंग यांनी जवळपास सात वर्षांनंतर भारताला भेट दिली. गलवान संघर्षानंतरचा हा त्यांचा पहिला भारत दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या विश्वासाच्या तीन ‘परस्पर’ तत्त्वांवर भर दिला आहे. ही तीन तत्त्वे म्हणजे परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित असल्याचे जाहीर करण्यात आले. याव्यतिरिक्त भारताने दोन्ही देशांमधील मतभेदांचे वादात रूपांतर होता कामा नये यावरही भर दिला. मोदी आणि जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची द्विपक्षीय बैठक झाली. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती.

भारत-चीन संबंध हळूहळू सुधारत असल्याची चिन्हे दिसत असतानाच ही बैठक झाली. बैठकीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी सामरिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या गरजेवर भर दिला. प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर दोन्ही बाजूंनी परस्पर सामंजस्य वाढवावे आणि आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जावे, यावर दोन्ही नेते सहमत झाले. पंतप्रधानांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठी चीनने दिलेल्या पाठिंब्याचे आणि 2026 च्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

ऑगस्ट 2025 मध्ये तियानजिन येथे झालेल्या त्यांच्या शेवटच्या भेटीपासून भारत-चीन संबंधांमध्ये झालेल्या स्थिर प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांनी आपल्या संबंधांकडे सामरिक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, यावर त्यांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर विकासासाठी सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्य अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. दोन्ही बाजूंनी सीमा-संबंधित मुद्यांवरील विद्यमान करार आणि सामंजस्य करारांचे पालन केले पाहिजे, यावर त्यांनी जोर दिला. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या एकूण संबंधांच्या राजकीय दृष्टिकोनावर आणि दोन्ही देशांतील लोकांच्या दीर्घकालीन हितांवर आधारित, सीमाविवादावर एक न्याय्य, वाजवी आणि परस्पर सहमतीने तोडगा काढण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली.

व्यापारातील असंतुलनावर चर्चा

पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीची नोंद घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापारी संबंधांना अधिक चालना देण्याच्या गरजेवर भर दिला. आर्थिक आणि व्यापारी संबंधांच्या बाबतीत, त्यांनी व्यापारातील संरचनात्मक असमतोल आणि पुरवठा साखळीतील समस्यांसह एकमेकांच्या चिंता दूर करण्याची, तसेच अर्थपूर्ण आणि विश्वसनीय बाजारपेठ प्रवेश सुलभ करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. भारताचा चीनसोबतचा व्यापार असंतुलित आहे, म्हणजेच भारत चीनकडून जास्त आयात करतो आणि कमी निर्यात करतो या समस्येकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

मोदी-जिनपिंग काय म्हणाले…

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात चीनकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आता आपल्याला द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे. भारतात तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.

– नरेंद्र मोदी, भारतीय पंतप्रधान

 

चीनने भारतासोबत चांगले संबंध राखण्यास नेहमीच पाठिंबा दिला आहे. जरी आपल्या दोन्ही देशांची राष्ट्रीय परिस्थिती वेगळी असली तरी, आपण एकमेकांच्या सामर्थ्यातून पूर्णपणे शिकू शकतो. मतभेदांचे वादात रुपांतर होऊ नये यासाठी दक्षता घेऊया.

– शी जिनपिंग, चीनचे राष्ट्राध्यक्ष

Comments are closed.