मोहसिन नक्वी हिंदुस्थानी संघावर आक्षेप घेऊ शकत नाहीत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या महिला संघाने आशिया चषक स्पर्धा जिंकली. पण या स्पर्धेची ट्रॉफी आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून प्रदान करण्यात येणार असल्याचे समजताच हिंदुस्थानी संघाने ती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयावर पाकिस्तानचे मोहसिन नक्वी कोणताच आक्षेप घेऊ शकत नाहीत, असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. शुक्ला म्हणाले की, आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्या हातून न स्वीकारण्याचा निर्णय हा बीसीसीआयचा होता आणि त्यांनी तो खेळाडूंना कळवला होता. हा निर्णय एकमताने संमत झाला होता. त्यामुळे मोहसिन नक्वी या निर्णयावर आक्षेप घेऊ शकत नाहीत.

Comments are closed.