ग्रीन कार्डच्या नियमांमध्ये बदल; ट्रम्प सरकारविरोधात 22 राज्ये कोर्टात
अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्याची परवानगी देणाऱया ग्रीन कार्डमधील नियमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारने केलेल्या बदलांना तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यासह 22 राज्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
बेकायदा स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने यूएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस)ने ग्रीन कार्डबाबत नवे धोरण आणले आहे. त्यानुसार, ग्रीन कार्डसाठी अर्ज करायचा असल्यास संबंधित व्यक्तीला आपल्या देशातील अमेरिकी दूतावासातून नव्याने अर्ज करावा लागेल. तसेच, या व्यक्तीला सरकारी योजनांची गरज लागेल का, याचाही आढावा घेतला जाणार आहे.
Comments are closed.