चीनच्या मुद्द्यावरून सलमान खानचा ‘मातृभूमी’ चित्रपट रखडला? प्रदर्शनाबाबत अनिश्चितता कायम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सुरुवातीला अनिश्चितता कायम आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने जाहीर झालेला हा चित्रपट २०२० मधील गलवान खोऱ्यातील हिंदुस्थान-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटाचे प्रदर्शन आधीच पुढे ढकलण्यात आले असून, आता केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडे (CBFC) चित्रपट कधी सादर केला जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार अलीकडे सोशल मीडियावर ‘मातृभूमी’ची पुढील आठवड्यात CBFCकडून स्क्रीनिंग होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. चित्रपटाचा विषय हिंदुस्थान -चीन संघर्षाशी संबंधित असल्याने त्यातील चीनशी संबंधित संदर्भांबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. निर्माते संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, या संदर्भातील सर्व बाबी अधिकृतरीत्या स्पष्ट झालेल्या नाहीत. याआधी जुलैमध्ये चित्रपटाच्या CBFC प्रमाणपत्राला अडथळा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निर्मात्यांना २०२६ मध्येच चित्रपट प्रदर्शित करण्याची आशा असल्याचे वृत्त आहे. मात्र, संबंधित मुद्द्यांवर तोडगा निघण्यास विलंब झाल्यास प्रदर्शन २०२७पर्यंत पुढे जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांच्या हवाल्याने व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, चित्रपटाचे काही VFX काम अद्याप सुरू असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. CBFCसह संबंधित विभागांकडून चित्रपटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.