बांगलादेशची लागली लॉटरी, एकही सामना न खेळता थेट सेमीफायनलमध्ये एंट्री! भारताशी होईल टक्कर?

जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळली जाणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे सामने होणार असून महिला संघाच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्याचे संघ निश्चित झाले आहेत. या फेरीसाठी बांगलादेश एकही चेंडू न खेळता थेट पात्र ठरला आहे.

झाले असे की, गुरूवारी (१७ सप्टेंबर) बांगलादेश आणि चीन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला जाणार होता. हा सामना ओल्या मैदानामुळे रद्द झाला आणि बांगलादेश उपांत्य फेरीत पोहोचला. या सामन्यात नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे एकही चेंडू न खेळता बांगलादेश महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

बांगलादेशने टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीमुळे त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीचा सामना निशिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होणार होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मैदान खराब झाले. सामन्याच्या दिवशी पाऊस झाला नाही, पण मैदान खेळण्यायोग्य नव्हते. पंचांनी मैदानाची पाहणी केली असता त्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

खराब हवामान किंवा इतर कारणांमुळे उपांत्यपूर्व फेरीचा सामना रद्द झाल्यास, आयसीसीमध्ये उच्च मानांकन असलेला संघ पुढील फेरीत जातो. आयसीसी टी२० क्रमवारीमध्ये बांगलादेशचे मानांकन चीनपेक्षा उच्च आहे. त्यामुळे ते उपांत्य फेरीत पोहोचले.

बांगलादेशचा या स्पर्धेतील इतिहास पाहिला तर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी २०१० आणि २०१४ मध्ये रौप्य, तसेच २०२३ मध्ये कांस्य पदक पटकावले आहे. आता त्यांना चौथे पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे.

या स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जपानशी आहे. हा सामना १८ सप्टेंबरला निशिन येथे खेळला जाणार आहे. तसेच उपांत्य फेरीचे सामने २० सप्टेंबर आणि सुवर्ण पदकाचा म्हणजेच अंतिम सामना २२ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. त्याचदिवशी कांस्य पदकाचाही सामना होणार आहे. (asian-games-2026 Bangladesh Women Cricket Through to the semi-finals)

Comments are closed.