Konkan News – दापोलीत गौरी सणाचा बेत तिखटाने साजरा ; मटण खरेदीसाठी ग्राहकांची लागली रांगच रांग
कोकणातील दापोलीत गौरीचा सण मोठा मानला जातो. या गौरीच्या सणाला प्रामुख्याने तिखटाचा बेत आखला जातो त्याप्रमाणे गौरी पूजनाच्या दिवशी खायचा वार शुक्रवार आल्याने बहुतेकांनी वडे मटणाच्या तिखटाचा सण साजरा केला . याची प्रचिती ही दापोली शहराला अगदी लागुनच असलेल्या गिम्हवणे येथील मटण शॉप वर मटण खरेदीसाठी झालेल्या ग्राहकांच्या मोठया गर्दीच्या लागलेल्या रांगेवरून दिसून आले .
गौरी गणपतीच्या सणाला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दापोलीत मोठ्या संख्येने मुंबई पुणे ठाणेकर चाकरमानी आपल्या मूळ गावी आले आहेत सर्व कुटुंब एकत्र आल्याने गौरी गणपतीच्या सणाला उत्साहाच्या हौसेचे मोल आले . त्यामुळे एकत्रित आलेल्या कुटुंबातील लोकांनी गौरी पुजनाच्या सणाला तिखट बेत आखला. शुक्रवारी सर्वसाधारणपणे लोक मांसाहार करतात त्यानुसार देवाच्या पूजेअर्चेचे काम आटोपल्यानंत मांसाहारी जेवणाचा बेत केला त्यासाठी चिकन ऐवजी मटण वडे मेनू ठेवला .वडे मटनाचा बेत ठरल्याने मटण खरेदी करिता मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले . 900 रुपये प्रति किलो मटणाचा दर असतानाही मटण खरेदीसाठी पहाटेपासून अगदी दुपारपर्यंत बरीच मोठी रांग लागलेली दिसत होती.
Comments are closed.