परतीचा प्रवास; एसटी सोडणार 2 हजारांपेक्षा जास्त गाड्या, रविवारी कोकणवासी मुंबईकडे रवाना होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेले पाच दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर आज वाजत-गाजत गौरीगणपतींचे विसर्जन होणार आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर कोकणवासी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. कोकणातील गणेशभक्तांसाठी रत्नागिरी एसटी विभागातून उद्या, शनिवारी 237 बस आणि रविवारी 1661 बस सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरीतून एसटीच्या 2 हजार 507 गाडय़ा सुटणार आहेत.

घरच्या गणपतीसाठी मोठय़ा संख्येने चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. मुंबईतून गावी येण्यासाठी एसटीने जादा गाडय़ांची आणि ग्रुप बुकिंगची सोय केली होती. विसर्जनानंतर कोकणवासी पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. शनिवार-रविवार असल्यामुळे कोकणवासी रविवारी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर सोमवारी 21 सप्टेंबरला 457 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत एसटी जादा गाडय़ा सोडणार आहे. 22 सप्टेंबरला 51, 23 सप्टेंबरला 19, 24 सप्टेंबरला 19, 25 सप्टेंबरला 22, 26 सप्टेंबरला 20 आणि 27 सप्टेंबरला 21 गाडय़ा सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 2 हजार 507 गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वे फुल्ल

कोकण रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी जादा गाडय़ा सोडल्या आहेत. या सर्व गाडय़ांचे बुपिंग फुल्ल झाले आहेत. काही खासगी ट्रव्हल्स कोकणात वळवण्यात आल्या आहेत.

Comments are closed.