बांगलादेशी घुसखोरांवर आसाम पोलिसांची कारवाई
गुवाहाटी: आसाम पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी गुवाहाटी आणि रंगिया येथे दोन वेगवेगळ्या अभियानांमध्म्ये 27 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले. या घुसखोरांमध्ये महिला अन् अल्पवयीनांचाही समावेश आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या घुसखोरांना बांगलादेशात परत पाठविले जाणार असल्याच माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.घुसखोरांच्या एका समुहाविषयी माहिती मिळाल्यावर सर्व प्रथम गुवाहाटी येथे बसस्थानक परिसरातून 12 जणांना ताब्यात घेण्यात आले. या लोकांनी जम्मू-तावी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या आणखी एका समुहाविषयी माहिती दिली होती. ज्यानंतर त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रेल्वे सुरक्षा पोलिसांना सतर्क केले आणि 15 जणांच्या समुहाला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त कुलेंद्रनाथ डेका यांनी सांगितले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 27 जणांपैकी कुणाकडेच दस्तऐवज नव्हते. हे सर्व लोक ढाका, सुनामगंज, गोपालगंज, बागेरहाट, खुलना आणि मयमनसिंह या बांगलादेशातील भागांचे रहिवासी आहेत.
Comments are closed.