एमबीए-एमएमएसला मागणी वाढली, यंदा 45 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाला मागणी वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत 2 हजारांपेक्षा जास्त संख्येने वाढ झाली. यंदा 44 हजार 788 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षी 42 हजार 677 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमासाठी पेंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या चार फेऱया व संस्थात्मक फेरी राबविली गेली. यानंतर राज्यातील एकूण 412 एमबीए-एमएमएस महाविद्यालयातून या अभ्यासक्रमाच्या एकूण 56 हजार 931 उपलब्ध जागांपैकी 44 हजार 788 जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत.
Comments are closed.