पाकिस्तानमध्ये स्फोट, 16 ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाच्या कोहाट जिह्यात शुक्रवारी ऐन नमाज सुरू असताना झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी लादलेले एक भरधाव वाहन मशिदीत घुसले. हा हल्ला इतका भीषण होता की, मशिदीच्या आजूबाजूच्या इमारतीच्या काचाही फुटल्या. एक भिंतही खाली कोसळली. या हल्ल्यानंतर रेस्क्यू 1122 चे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य तत्काळ सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments are closed.