युद्ध सुरू असूनही इराणचे राष्ट्राध्यक्ष जाणार अमेरिकेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिकेमध्ये गेल्या सात महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. अमेरिकेने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला मार्च महिन्यात केलेल्या मोठ्या हल्ल्यात ठार केले. तरीही आता इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अली अराघची हे अमेरिकेत जाणार आहेत. न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला ते संबोधित करणार आहेत. हे नेते अमेरिकेत जाणार असले तरीही त्यांना अटक किंवा ताब्यात घेता येणार नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने पजेश्कियान आणि अराघची यांचा व्हिसा मंजूर केला आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सामील होण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांनादेखील अमेरिकेने परवानगी दिली आहे. इराणच्या नेत्यांना न्यूयॉर्कमध्ये इतर कुठेही फिरता येणार नाही तसेच अमेरिकेतून त्यांना कोणतीही वस्तू खरेदीदेखील करता येणार नाही.

Comments are closed.